सरकारच्या 'वैद्यकीय' भूमिकेविरोधात मराठा समाजातील विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या भूमिकेविरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

यंदा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये मराठा आरक्षण रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्‍यात आले होते. विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करावेत, यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. याची दखल घेत राज्य सरकारने अध्यादेश काढला. त्यानुसार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला; परंतु हे प्रवेश टिकविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नसल्याचा आरोप केला. आरक्षणाबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना ही याचिका नागपूर न्यायालयात का जाते, असा सवाल उपस्थित केला आहे.

Web Title: Students from Maratha community protested against

संबंधित बातम्या

Saam TV Live