'पप्पा, तुम्हीही आता भाजपमध्ये या!' ,मुलाची वडिलां विनंती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय झाला. या विजयानंतर त्यांनी आता त्यांच्या वडिलांना भाजपमध्ये येण्याची विनंती केली. याबाबत सुजय म्हणाले, माझा निर्णय योग्य होता, असे आता माझे वडील म्हणत आहेत. आता तुम्हीदेखील भाजपमध्ये यावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे.

लोकसभा निवडणुकीपूवी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर नगरमधून त्यांचा विजय झाला. या विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''आम्ही आमचे सर्व काही पणाला लावले होते. वडिलांना त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही सोडावे लागले होते. माझ्या विजयाचा निकाल पाहून माझे वडील फार आनंदात होते, त्यांना माझा अभिमान वाटत असावा''.

दरम्यान, आम्ही पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसची काय परिस्थिती झाली हे आता निकालातून दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
 
Web Title:Sujay Vikhe requested to Radhakrishna Vikhe Patil to enter in BJP

संबंधित बातम्या

Saam TV Live