मुघलांनी भारताला श्रीमंत केले - स्वरा भास्कर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 जुलै 2019

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहत असते. आता स्वरा भास्करने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मोघलांनीच भारताला श्रीमंत केले असल्याचे म्हटले आहे. या ट्विट सोबत स्वरा भास्करने फॅक्ट आणि हिस्ट्रीसारख्या हॅशटॅगचा वापर केला आहे. 

स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये एक लेख ट्विट केला आहे. या लेखांमध्ये लेखकांने म्हटले आहे की, मुघल भारतात राज्य करण्याच्या हेतूने आले खरे पण त्यांच्यामुळे भारतातील जिवनमान बदलण्यास सुरवात झाली. मुघलांनी भारतातील व्यापराला चालना दिली. रस्त्यांची कामे केली. समुद्री मार्ग, बंदरे स्थापन करण्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली. 

वरील गोष्टींचा आधार घेत स्वरा भास्करने या सर्व गोष्टी पाहिल्यास मुघलांनीच भारताला श्रीमंत केले असे म्हटले आहे. यानंतर मात्र, नेटीझन्सनी स्वरावर जोरदार हल्ला चढवत तिच्यावर टीका केली आहे. स्वराला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.

Web Title: Swara Bhasker trolled for saying Mughals made India rich

संबंधित बातम्या

Saam TV Live