नाना पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयाकडून क्‍लीन चिट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी प्रतिक्रिया दिली असून, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार, असेही तिने म्हटले आहे. 

मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी प्रतिक्रिया दिली असून, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार, असेही तिने म्हटले आहे. 

मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये तनुश्रीने नाना यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद केली आहे. दहा वर्षांपूर्वी 2008 मध्ये "हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नाना यांनी आपल्यासोबत गैरवर्तन करून छळ केला, असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी आज अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये या प्रकरणात बी समरी अहवाल दाखल केला. पोलिसांना या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावे मिळालेले नाहीत, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. बी समरी अहवाल म्हणजे आरोपीविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये तथ्य नसून प्रकरण बंद करीत आहे. यामुळे नाना यांना दिलासा मिळाला आहे. 

मात्र, पोलिसांच्या अहवालाबाबत तक्रारदार तनुश्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्ट पोलिस यंत्रणेने त्याहून अधिक भ्रष्ट असलेल्या नाना यांना क्‍लीन चिट दिली आहे, असा दावा करत या प्रकरणात पोलिसांना घाईने न्यायालयात अहवाल दाखल करण्याची आवश्‍यकता काय होती, माझ्या साक्षीदारांचा जबाब न घेताच बोगस साक्षीदारांच्या जबानी पोलिसांनी कशा दाखल केल्या, असे प्रश्‍न तिने उपस्थित केले आहेत. भारतीय महिला असल्यामुळे मला याबाबत आश्‍चर्य किंवा धक्का बसलेला नाही. बलात्काराचा आरोप असलेल्या अभिनेता आलोकनाथ यांना क्‍लीन चिट मिळते, तर पाटेकर यांच्यासाठीदेखील हे शक्‍य आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या अहवालाबाबत न्यायालयात दाद मागणार असून, उच्च न्यायालयातही याबाबत याचिका करू, असे तनुश्री यांचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले. 

"हॉर्न ओके प्लीज'मधील एका नृत्याच्या चित्रीकरणादरम्यान पाटेकर यांनी माझ्यासोबत अश्‍लील वर्तन केले, त्यामुळे मी अस्वस्थ होऊन तो सीन न करताच सेटवरून निघून गेले होते, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्यावरही या वेळी आरोप करण्यात आले होते. "मी टू' मोहिमेअंतर्गत या घटनेचा उल्लेख तिने केला होता आणि दहा वर्षांनंतर पोलिस फिर्याद दाखल केली होती. 

Web Title: Tanushree Dutta: Nana Patekar Gets Clean Chit


संबंधित बातम्या

Saam TV Live