काळ्या पिवळ्या टॅक्सी चालक जाणार संपावर; मुंबईकरांची अडचण पुन्हा वाढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

नुकतंच ओला-उबरच्या संपातून सुटका झालेल्या मुंबईकरांची अडचण पुन्हा वाढणार आहे. यावेळी मुंबईकरांना वेठीस धरणार आहेत ते काळी-पिवळी टॅक्सी चालक. 5 हजार काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने नुतनीकरण न झाल्यास दिवाळीनंतर, 15 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर काळ्या पिवळ्या टॅक्सीसह धडक मारण्याची धमकी टॅक्सीचालकांनी दिली आहे.

25 वर्ष जुन्या टॅक्सी रस्त्यावरुन बंद करण्याचा आदेश याआधीच वाहतूक विभागाने दिला आहे. मात्र वाहतूक संघटनांच्या मागणीमुळे वाहतूक विभागाकडून जुन्या टॅक्सीना फिटनेस प्रमाणपत्र आणि परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. मात्र, हे फिटनेस प्रमाणपत्र सेंट्रल, पूर्व, पश्चिम आणि बोरीवली येथील वाहतूक कार्यालयातून देणे बंद केले आहे. त्यासाठी टॅक्सीचालकांना मुंबई बाहेरच्या वाशी, पनवेल आणि ऐरोली येथील कार्यालयात परवाना मिळवण्यासाठी जाण्यास सांगण्यात येते. हे फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि परवाना नूतनीकरण करताना अनेक जाचक अटींमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत.

WebTitle : marathi news mumbai taxi drivers to go on strike  

संबंधित बातम्या

Saam TV Live