IPL Auction 2020 | कोणत्या संघात कोणते खेळाडू; पाहा

IPL Auction 2020 | कोणत्या संघात कोणते खेळाडू; पाहा

कोलकता : आयपीएलच्या पुढील मोसमाचा लिलाव काल (ता.19) कोलकत्यात पार पडला. या लिलावात अनेक तरुण खेळाडूंना आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आणि त्यांना चांगली रक्कम देऊन करारबद्ध करण्यात आले आहे. वेस्टइंडिजच्या बिगहिटर खेळाडूंना सर्वाधिक किंमत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तसे काहीच झाले नाही. भारत आणि विंडीज यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तुफान फलंदाजी करणाऱ्या शिमरॉन हेटमायरला दिल्ली कॅपिटल्सने 7.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले.  

मानसिक स्वास्थ नीट नाही म्हणून ऑस्ट्रेलियाच्या संघातून माघार घेणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलवर तब्बल 10 कोटी 75 लाखांची बोली लागली आणि ही भली मोठी किंमत मोजून किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला करारबद्ध केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोलकता नाईट रायडर्सने 15.50 कोटी रुपयांना करारबद्ध केले. 

कोणत्या संघाने घेतले कोणते खेळाडू

1. मुंबई इंडियन्स  
- ख्रिस लिन : 2 कोटी
- नेथन कुल्टर नाईल : 8 कोटी
- सौरभ तिवारी : 50 लाख
- मोहसिन खान : 20 लाख
- दिग्विजय देशमुख : 20 लाख
- बलवंत राय सिंग : 20 लाख

2. कोलकता नाईट रायडर्स 
- इयॉन मॉर्गन : 5.20 कोटी
- पॅट कमिन्स : 15.50 कोटी
- मनिमरण सिद्धार्थ : 20 लाख
- वरुण चर्कवर्ती : 4 कोटी
- राहुल त्रिपाठी : 60 लाख 
- ख्रिस ग्रीन : 20 लाख 
- प्रविण तांबे : 20 लाख 
- निखिल नाईक : 20 लाख 
- टॉम बॅटन : 1 कोटी

3. सनरायझर्स हैदराबाद 
- मिशेल मार्श : 2 कोटी 
- प्रियम गर्ग : 1.9 कोटी
- विराट सिंह : 1.9 कोटी 
- बी संदिप : 20 लाख 
- फेबियन अॅलेन : 50 लाख 
- अब्दुल समाद : 20 लाख 
- संजय यादव : 20 लाख 

4. दिल्ली कॅपिटल्स 
- शिमरॉन हेटमायर : 7.75 कोटी
- ऍलेक्स केरी : 2.40 कोटी
- ख्रिस वोक्स : 1.50 कोटी
- मोहित शर्मा : 50 लाख
- जेसन रॉय : 1.50 कोटी
- तुषार देशपांडे : 20 लाख
- ललित यादव : 20 लाख 
- मार्कस स्टोनिस : 4.8 कोटी 

5. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 
- ख्रिस मॉरिस : 10 कोटी
- ऍरॉन फिंच : 4.40 कोटी
- जोश फिलीपे : 20 लाख
- केन रिचर्डसन : 4 कोटी 
- पवन देशपांडे : 20 लाख
- डेल स्टेन : 2 कोटी
- शाहबाझ अहमद : 20 लाख
- इसुरु उडाना : 50 लाख

6. किंग्ज इलेव्हन पंजाब 
- जेम्स निशाम : 50 लाख 
- रवी बिश्नोई : 2 कोटी
- ईशान पोरेल : 20 लाख
- दिपक हूडा : 50 लाख
- शेल्डन कॉट्रेल : 8.5 कोटी
- ग्लेन मॅक्सवेल : 10.75 कोटी
- ख्रिस जॉर्डन : 3 कोटी
- तजिंदर ढिल्लॉन : 20 लाख
- प्रभसिमरन सिंग : 55 लाख

7. चेन्नई सुपर किंग्ज 
- जोश हेझलवूड : 2 कोटी
- सॅम करन : 5.50 कोटी
- पियुष चावला : 6.75 कोटी
- आर साई किशोर : 20 लाख

8. राजस्थान रॉयल्स 
- रॉबिन उथप्पा : 3 कोटी 
- डेव्हिड मिलर : 75 लाख 
- कार्तिक त्यागी : 1.30 कोटी 
- आकाश सिंह : 20 लाख
- अनुज रावत : 80 लाख
- जयदेव उनाडकट : 3 कोटी
- ओश्ने थॉमस : 50 लाख 
- अनिरुद्ध जोशी : 20 लाख 
- ऍण्ड्रयू टाय : 1 कोटी
- टॉम करन : 1 कोटी


Web Title: Team Wise List Of Players Bought In IPL 2020 Auction

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com