मुंबईमध्ये थंडीनंतर तापमानाचा पारा उंचावला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

मुंबई - रविवारी कमाल तापमानात वाढ होवून थेट 36.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले. थंडीनंतर पहिल्यांदाच कमाल तापमान 36.7 अंशापर्यंत वाढल्याने रविवारचा दिवस उकाड्याचा ठरला. तापमानवाढीमुळे शरीरातील तापमान नियंत्रणात राहण्यासाठी सरबत, काकडी यासारख्या अन्नपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. 

कमाल तापमान 36.7 अंश सेल्सिअसवर पोहोचलेले असताना किमान तापमानही एका अंशाने वाढले. किमान तापमान 22 अंश सेल्सिअवर नोंदवले गेले. मार्चच्या पंधरवड्यापासून कमाल तापमानात हळूहळू चढ-उतार दिसून येते. मार्चच्या अखेरीत किमान तापमानही वाढू लागते. सध्या सुरु असलेल्या उकाडा हा वातावरणातील बदलांमुळे होत असून हळूहळू उन्हाळा स्थिरावत असल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या पूर्वेकडून वाहणारे उष्ण प्रवाहाचे वारे जास्त प्रभावी ठरल्याने ही तापमान वाढ झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून दिली गेली. 

तापमानवाढ लक्षात घेत आजारपणही वाढण्याची शक्‍यता आहे. तापमानात वाढ दिसून येत असल्याने व्हायरल तापाचीही भीती असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. त्यामुळे उन्हात जाण्यापूर्वी डोक्‍यावर स्कार्फ बांधणे, डोळ्यांवर गॉगल लावणे विसरू नका, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे. 

Web Title: The temperature increase in Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live