रविवारी मुंबईचा पारा ३८ अंशांवर! दशकातील ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

मुंबई - ऑक्‍टोबर संपायला तीन दिवस शिल्लक असतानाही कमाल तापमानातील वाढ कायम अाहे. रविवारी मुंबईचा कमाल पारा ३८ अंशावर होता. दशकातील ऑक्टोबरमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान ठरले.

यापूर्वी २०१५ मध्ये ३८.६ अंश एवढे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले होते. केवळ मुंबईच नव्हे; तर कोकणपट्ट्यातही तापमानात वाढ होती. पूर्वेकडील पठारांवरून येणारे कोरडे वारे किनारपट्टीवरील बाष्प समुद्रात ढकलत असल्याने किनारपट्टीवरही तापमान वाढले आहे. ऑक्टोबरमध्ये नऊ वेळा कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास दिसून आले. रविवारी कमाल तापमानाने मोठी मजल मारली.

WebTitle : marathi news Mumbai temperature rise in October month 

संबंधित बातम्या

Saam TV Live