मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने केली. 

मुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने केली. 

किमान तापमानातही गुरुवारी एका अंशाने वाढ दिसून आली. समुद्रावरून वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्याचे दुपारी 12 च्या सुमारास किनाऱ्यावर आगमन होते. हे आगमन लांबले, की तापमानवाढ होते. मुंबईतील तापमानवाढीत सध्या हेच कारण असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. खाऱ्या वाऱ्यांच्या विलंबाने कोकण पट्ट्यात एक ते दोन अंशांनी वाढ दिसून आली. राज्यातील सर्वांत जास्त कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात 36 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. राज्यातील उर्वरित भागांत कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी अधिक होते; तर किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट नोंदवली जात आहे. सर्वांत जास्त किमान तापमान जळगाव येथे 13 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

WebTitle  : marathi news Mumbai temperature weather 

संबंधित बातम्या

Saam TV Live