मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कालही मुंबई आणि कोकणात पावसानं हजेरी लावली. जूनच्या पहिल्याच आठवडय़ात मान्सून महाराष्ट्रात धडकला, मात्र पुन्हा पावसानं दमदार एन्ट्री घेतल्यानं शेतकऱयांनाही दिलासा मिळणार आहे.

मान्सूनच्या पावसात खंड पडल्याने राज्यभरात पेरणीही रखडली होती. जोरदार सुरुवात केलेला मान्सून दडून बसल्याने राज्यातील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला होता. मात्र, येत्या काही दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live