पावसामुळे मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 जून 2018

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहर त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहर त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुमाबी शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसंच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहेत. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या 24 तासांत जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक भागांत संततधार पाऊस सुरूच असून, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस मुक्कामी राहणार आहे.

कोकणात गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे, शेतकरी राजा सुखावला असून भातशेतीत पेरणीची लगबग सुरू झाली आहे. 

WebTitle :: marathi news mumbai thane palghar rain updates 

संबंधित बातम्या

Saam TV Live