ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी घातक : छगन भुजबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

मुंबई : ओबीसींचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी घातक असल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे सांगितले. 

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायमूर्ती रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागांत विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे; पण मुळातच, देशात ओबीसींची जनगणना झाली नसताना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही, हे ठरविले आहे, असा सवाल करत ओबीसींचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी घातक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

भविष्यात ओबीसी आरक्षणाप्रमाणे इतर आरक्षणाबाबतही असे निर्णय होण्याचे शक्‍यता आहे. त्यामुळे त्याविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज असल्याचेही भुजबळ यांनी अधोरेखित केले. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते.  

Web Title : Three pieces of OBCs are dangerous for OBCs: Chhagan Bhujbal

संबंधित बातम्या

Saam TV Live