आज आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

मुंबई - तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर गेलेली आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत अखेर 15 जून रोजी काढण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना प्रवेशाची सोडत काढण्यात येत असल्याने शिक्षण विभागाचा कारभार "वरातीमागून घोडे' याप्रमाणे सुरू असल्याचे दिसत आहे. 

मुंबई - तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर गेलेली आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत अखेर 15 जून रोजी काढण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना प्रवेशाची सोडत काढण्यात येत असल्याने शिक्षण विभागाचा कारभार "वरातीमागून घोडे' याप्रमाणे सुरू असल्याचे दिसत आहे. 

आरटीई प्रवेशांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. प्रवेशाची पहिली सोडत 8 एप्रिल रोजी काढण्यात आली. यामध्ये राज्यातून 67 हजार 706; तर मुंबईतून 3 हजार 532 जणांची निवड झाली. यापैकी 46 हजार 842 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत; तर मुंबईतून निवड झालेल्या 3 हजार 532 बालकांपैकी 2259 बालकांनी प्रवेश घेतला आहे. 65 विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत; तर 1207 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. पहिल्या सोडतीमध्ये नावे आलेल्या पालकांनी प्रवेश न घेतलेल्या जागा दुसऱ्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. दुसरी सोडत यापूर्वी 20 आणि 21 मे रोजी काढण्यात येणार होती. परंतु सोडतीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती लांबणीवर गेली आहे. अखेर दुसऱ्या सोडतीला मुहूर्त मिळाला असून शनिवारी ही सोडत काढण्यात येईल. या सोडतीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

शाळा सोमवारपासून सुरू होत असल्याने आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांनी प्रवेश न मिळाल्याने पर्यायी शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत. यामुळे ही सोडत केवळ दिखाऊ असल्याचा आरोप होऊ लागला आहे. 

Web Title: Today second draw of RTE


संबंधित बातम्या

Saam TV Live