मोठा निर्णय! 'हा' टोलनाका होणार बंद?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरणारा हा खेड -शिवापूर टोलनाका रस्ता रुंदीकरणाचं काम आणि वाहतूक कोंडी, इथं हे नित्याचच मात्र यातून लवकरच वाहन चालकांची सुटका होण्याची शक्यता आहे. हा टोलनाका बंद करण्याचा इशाराच जिल्हा प्रशासनानं रस्त्याच्या कंत्राटदाराला दिलाय. एका महिन्यात रस्ता रुंदी करणाचं काम पूर्ण झालं नाही तर तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी राज्य सरकारकडे पाठवणार आहेत.

गेल्या कित्येक महिन्यांपासून  पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरु आहे. महामार्गाची ठिकठिकाणी अशी दुरवस्था आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून सर्व्हीस रोडकडे दुर्लक्ष  केलं गेलं. त्यामुळं नाईलाजास्तव बैलगाड्यासह ट्रॅक्टर महामार्गावर आणावी  लागताय. यातून स्थानिकांमध्ये असंतोष होता. याविरोधात टोलनाका हटाव समितीनं आक्रमक लढा दिला.

केवळ खेड-शिवापूर टोलनाका नाहीच तर राज्यात संपूर्ण टोलमाफी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. जिल्हा प्रशासनानं दिलेल्या या अल्टिमेटममुळं रस्ता रुंदीकरणाचं काम वेळत पुर्ण करावं लागणार आहे. तसं न केल्यास टोलवसुली बंद करावी लागणार आहे.

Web Title : This Toll Plaza Will Close Soon

संबंधित बातम्या

Saam TV Live