ट्रॅाफिक पोलिस होतायत बहिरे... काय आहे नेमक कारण?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 डिसेंबर 2019

वाहनांच्या हॉर्नचा कर्कश आवाज आपण जरा देखिल सहन करू शकत नाही. मग भर ट्रॅफिकमध्ये उभा असलेला पोलिस कसा सहन करत असेल, याची कल्पनाही करवत नाही. सतत कानावर पडत असलेल्या या गोंगाटामुळे मुंबई पोलिस दलातल्या तीन टक्के वाहतूक पोलिसांना बहिरेपणा आलाय.

मुंबई वाहतूक पोलिस आणि केईएस हॉस्पिटल यांनी नुकतीच एक पाहणी केलीय. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

आजघडीला मुंबईत 33 लाखांच्या आसपास वाहनं आहेत. या वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी जवळपास 2 हजार पोलिस आहेत. मात्र वाहनांचे आवाज रस्त्यावरील धूळ, धूर यांचा गंभीर परिणाम वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर होतोय. यात हवालदारापासून सहाय्यक आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अहवालानुसार 26 टक्के पोलिसांना ताणतणाव, 20 टक्के पोलिसांना उच्च रक्तदाब, 14 टक्के पोलिसांना मधुमेहाचा त्रास असल्याचं दिसून आलंय. त्याशिवाय डोळ्यांचे विविध त्रास त्वचाविकार यांचाही त्रास पोलिसांना होतोय. सर्वांत गंभीर बाब वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे म्हणजे 3 टक्के पोलिसांना बहिरेपणा आलाय.

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र आपली जबाबदारी पार पाडताना, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर सर्वच यंत्रणांनी त्याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे.

Web Title : Traffic Police Was Deaf Becouse Of Vehicles Honking

संबंधित बातम्या

Saam TV Live