पाच वर्षात तृतीयपंथी मतदारांची संख्या झाली दुप्पट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 मार्च 2019

मुंबई : बहुप्रतिक्षीत लोकसभा निवडणूक काल (ता. 10) जाहीर झाली. देशभरात सात टप्प्यात निवडणूका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूका घेतल्या जातील. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांची आकडेवारीही जाहीर केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महिला व पुरूष मतदारांसह तृतीयपंथी मतदारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. 

महाराष्ट्रात 2014 तृतीयपंथी मतदारांची संख्या सुमारे 918 इतकी होती, तर आता 2019 मध्ये ही संख्या 2,086 इतकी झाली आहे. या आकडेवारीनुसार तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत तब्बल दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते. तर पुरूष मतदारांची संख्या 2014 मध्ये 4,27,70,991 होती, ती 2019 मध्ये 4,57,02,579 इतकी झाली आहे. तसेच महिला मतदारांची संख्या 2014 मध्ये 3,80,26,914 होती, ती आता 4,16,25,819 पोहोचली आहे. 

2014 पुरुष : 4,27,70,991
2019 पुरुष : 4,57,02,579

2014 महिला : 3,80,26,914
2019 महिला : 4,16,25,819

2014 तृतीयपंथी : 918
2019 तृतीयपंथी : 2,086

एकूण
2014 :- 8,07,98,823
2019 :- 8,73,30,484

Web Title: Transgender voter become double in 5 years

संबंधित बातम्या

Saam TV Live