उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टोला हाणत म्हणाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मुंबई : राज्यात पूर परिस्थिती भीषण आहे.पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. अश्या परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याचं डोक्यात येतंच कसं अश्या प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला दिला आहे.पूर परिस्थितीमुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

पुरामुळे एकूणच परिस्थिती गंभीर आहे. आभाळ फटल्या सारखी परिस्थिती आहे. कोण कमी पडतंय या कडे लक्ष देण्याची वेळ नाही. शिवसेनेचे सर्व नेते खासदार मंत्री जनतेला मदत करत आहेत. गेले दोन तीन दिवस आम्ही स्थानिक शिवसिनिकांच्या संपर्कात आहोत. जी गरज आहे त्याची व्यवस्था करत आहोत, असेही उद्धव म्हणाले.

कोण काय करताय हे बघण्यापेक्षा आपण काय करतोय हे पाहण्याची गरज आहे.पुरात माणसं गेली,संसार उध्वस्त झाले. गुरांचा मोठा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर ओसरायला अजून काही वेळ लागेल. पूर ओसरल्यानंतर रोगराई वर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही पथक तयार केली आहेत. सर्वांनी या परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला पाहिजे. या नैसर्गिक आपत्तीत राजकारण न करता मदत केली पाहिजे.राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी की न करावी या सारख्या शब्दात न खेळता मदत केली पाहिजे. कर्नाटक सरकार पाणी सोडण्याचं पाप करत असेल तर ते एकदिवस समोर येईलच असेही उद्धव यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Uddhav Thackeray attacks Raj Thackeray demends on assembly election postponed

संबंधित बातम्या

Saam TV Live