ठाकरेंच्या घरी सनई-चौघडे...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 जानेवारी 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपला मुलगा अमितच्या लग्नात चक्का हळद खेळल्याचे दिसून आले. शनिवारी साम टिव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये हळदीच्या रंगात रंगलेले राज ठाकरे दिसून आले.

अमित ठाकरे यांचा मिताली बोरुडे यांच्याशी आज (रविवार) विवाह होत असून, या विवाह सोहळ्याला राजकारण, उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील कोण कोण हजर राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

अमित आणि मिताली यांचा शुभ विवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे होणार आहे. लग्नाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांचा आहे. शनिवारी संध्याकाळी आप्तेष्टांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पडला. राज ठाकरे यांचे 'कृष्णकुंज' हे निवासस्थान आणि परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले आहे. 

अमितचे काका आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना घरी जाऊन राज यांनी निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब पूर्णवेळ या सोहळ्यास हजर राहणार आहेत असे समजते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या परीने हा सोहळा संस्मरणीय ठराव म्हणून झपाटून कामाला लागले आहेत. 

अमित ठाकरे यांच्या लग्न पत्रिकेवर निमंत्रक म्हणून राज ठाकरेंशिवाय पत्नी शर्मिला, बहीण उर्वशी, राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सासूबाई यांची नावे आहेत.

उद्योगपती रतन टाटा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, नारायण राणे, रामदास आठवले आदी मान्यवरांना निमंत्रणे पोहोचलेली आहेत.

Web Title: Uddhav Thackeray to be present for the full time Amit's wedding ceremony

संबंधित बातम्या

Saam TV Live