ED ची नोटीस; उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मुंबई : ‘राज यांच्या ईडी चौकशी तून काही साध्य होणार नाही.’ अशी आपुलकीची प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी आज दिली. मातोश्रीवर काॅग्रेस बंडखोर आमदार निर्मला गावित व राष्ट्रवादीच्या माजी आमदार रश्मी बागल यांच्या पक्षप्रवेशानंतर ते बोलत होते. 

राजकारणात टोकाचे मतभेद असले तरी कठीण काळात कुटूंब म्हणून उद्धव व राज यांचे बंधुप्रेम लपून राहिलेले नाही. राज ठाकरे यांना ईडी ने नोटीस पाठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे यांना ह्रदयाच्या त्रासानंतर राज ठाकरे यांनी कोकणचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे धावर घेतली होती. रूग्णालयातून त्यांना राज यांनी स्वत: गाडीतून घरी पोहचवले होते. त्याचप्रकारे राज यांचे चिरंजीव अमित यांच्या आजारपणात उद्धव यांच्यासह संपुर्ण ठाकरे कुटूंब एकत्र होते. 

आता राज यांच्यावर ईडी च्या कारवाईची टांगती तलवार असताना उद्धव यांनी त्यांची पाठराखण केली आहे. या चौकशीतून फार काही साध्य होणार नाही असं ते म्हणाले. उद्या राज यांना ईडी समोर हजेरी लावण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Uddhav Thackeray statement on ED notice to Raj Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live