मुंबईमध्ये कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि शिवसेनेचे अरविंद सावंत,गजानन कीर्तिकर मारणार बाजी ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा !

उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा !
मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचीच हवा होती. उर्मिलासमोर भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी असले तरी उर्मिलाने प्रचारात घेतलले आघाडी लक्षणीय आहे. गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसने या मतदारसंघातून उर्मिलाला तिकीट देत निवडणूकीत मराठी मुलगी आणली. शेट्टींचा जनसंपर्क दांडगा असला तरी याच मतदारसंघातून गोविंदाने अनुभवी राम नाईक यांचा पराभव केला होता, हा इतिहास आहे. तसेच, उर्मिलाने प्रचारात आणि इतर बाबींमध्ये घेतलेली आघाडी बघता उत्तर मुंबईत उर्मिलाचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांची बाजी
उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 52.15 टक्के मतदान झाले. कॉंग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुंबादेवी, कुलाबा परिसरात या वेळी कमी मतदान झाले. ही बाब कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात जाण्याची शक्‍यता आहे. या भागातील मुस्लिम मते यापूर्वी निर्णायक ठरत होती; मात्र मतदारसंघ फेररचनेत शिवडी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत आल्यापासून येथील गणिते बदलली. या वेळी तुलनेने मलबार हिल, भायखळा आणि शिवडी या भागांत अधिक मतदान झाले. भायखळा परिसरातील मतदारांचा प्रतिसाद युती व आघाडीसाठी संमिश्र असल्यामुळे मलबार हिल येथील उच्चभ्रू, गुजराती, राजस्थानी मतदान निर्णायक ठरणार आहे. चिराबाजार, गिरगाव, खेतवाडी, ग्रॅंट रोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, शिवडी या भागांतील मतदानाचा टक्का 'जैसे थे' राहिला. त्यामुळे युतीत आनंदाचे वातावरण असून अरविंद सावंत यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

वायव्य मुंबईत सेनेच्या कीर्तिकरांनाच पसंती
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. कामत यांचे नुकतेच निधन झाल्याने काँग्रेस कीर्तिकरांविरुद्ध कोणाला उतविणार याबाबत विविध नावांची चर्चा होती. पण, आपल्या आंदोलनामुळे पक्षश्रेष्ठींकडे विश्वास निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांना संधी देण्यात आली असली तरी त्यांना विजय मिळणे कठीण असून किर्तिकरांची खासदारकी कायम राहणार!

Web Title: Urmila matondkar, Arvind Sawant and Gajanan Kirtikar likely to win Loksabha 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live