महागाईपासून दिलासा! आवक वाढली; दर घसरले...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

मुंबई - अवकाळी पावसामुळे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये भाज्यांचे भाव कडाडले होते; परंतु डिसेंबरमध्ये चांगल्या दर्जाच्या भाज्या बाजारात येऊ लागल्या असून, हळूहळू आवकही वाढू लागली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव किलोमागे १० ते २० रुपयांनी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा  मिळाला आहे. 

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत भाज्यांच्या भावांनी शंभरी गाठली होती; त्यामुळे गृहिणींचे घरखर्चाचे गणित कोलमडले होते. त्यात गेल्या दोन आठवड्यांत कांद्याने शंभरी पार केल्यामुळे घरखर्चात आणखी भर पडली; परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांचे भाव कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. 

टोमॅटोचे भाव ४० रुपयांवरून २० ते २५ रुपये, भेंडीचे भाव ६० ते ८० रुपयांवरून ५० रुपये, तर फ्लॉवरचा भाव ६० रुपयांवरून ४५ रुपये किलो झाला; परंतु पालेभाज्यांचे भाव चढेच आहेत. एक जुडी मेथीसाठी ४० रुपये, पालकसाठी ३० रुपये आणि चवळीसाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.

कांद्याचे भाव अजूनही शंभरीपारच आहेत. नवा कांदा १२० रुपये किलो, जुना कांदा १५० ते १६० रुपये किलो दराने विकला जात आहे. लसूण २५० ते ३०० रुपये, गाजर ८० रुपये, बीट ४० ते ५० रुपये किलो या दरांनी मिळत आहेत. 

भाजीपाला    पूर्वी    आता 
कोबी          ४०         ३०
ढोबळी मिरची      ८०    ६०
भेंडी          ८०          ५०
टोमॅटो     ४०    २०
मटार     १००        ६०
फरसबी     १२०        ८० 
कोथिंबीर      १००    ३०
वांगी       ६०    ४०
तोंडली      ८०          ६०

Web Title: Vegetables Price Low In Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live