#Vidhansabha2019 | 'या' आहेत मुंबईतील लक्षवेधी लढती..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या जागा पाहूयात..   

वांद्रे पूर्व मतदार संघ | विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना Vs तृप्ती सावंत, सेना बंडखोर  Vs झिशान सिद्धिकी कॉंग्रेस

मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या जागा पाहूयात..   

वांद्रे पूर्व मतदार संघ | विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना Vs तृप्ती सावंत, सेना बंडखोर  Vs झिशान सिद्धिकी कॉंग्रेस

मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्व मधून शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिलं गेलं. त्यामुळे तृप्ती सावंत यानी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. यासोबतच याच मतदारसंघात बाबा सिद्धिकी यांचा मुलगा झिशान सिद्धिकी निवडणुकीच्या रिंगणात आहे.       

भायखळा मतदार संघ | यामिनी जाधव, शिवसेना Vs वारीस पठाण, MIM Vs मधु चव्हाण, कॉंग्रेस Vs गीता गवळी, अखिल भारतीय सेना 

भायखळ्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील MIM ची एकमेव जागा ही वारीस पठाण यांच्याकडे आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेने माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेस ने माजी आमदार मधू चव्हाण यांना भायखळ्यातून तिकीट दिलंय. तर याच मतदार संघातून अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नशीब आजमावणार आहेत.    

माहीम मतदार संघ | सदा सरवणकर, शिवसेना VS संदीप देशपांडे, मनसे 

माहीममध्ये शिवसेना विरुद्ध मनसे आमनेसामने आलेत. यात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यासमोर मनसेचा प्रमुख चेहरा संदीप देशपांडे याचं आव्हान आहे. संदीप देशपांडे यांनी गेल्या काही काळात त्यांचा जनसंपर्क वाढवून अनेक प्रश्नांवर आंदोलनं देखील केली आहेत. त्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक आता आमदार होणार का हे पाहावं लागेल. 

       

     

दिंडोशी मतदार संघ |  सुनील प्रभू, शिवसेना Vs   विद्या चव्हाण, राष्ट्रवादी

यात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील प्रभू यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्यात थेट लढत होणार आहे. विद्या चव्हाण या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या मानल्या जातात पण राष्ट्रवादीचे मुद्दे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास त्या यशस्वी होतील का हे पाहावं लागेल. 

मानखुर्द मतदार संघ | अबू आझमी, समाजवादी पार्टी VS विठ्ठल लोकरे, शिवसेना 

मानखुर्द हा भाग तसा मुस्लीम बहुल. या मतदार संघात कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे समाजवादी पार्टीचे अबू आझमी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. या भागात शिवसेनेचा झेंडा फडकणार का ? हे पाहावं लागेल..

वांद्रे पश्चिम मतदार संघ | आशिष शेलार VS आसिफ झकेरिया, कॉंग्रेस

मुंबईतील अत्यंत चुरशीची लढत म्हणजे वांद्रे पश्चिममधील. यात भाजप विरुद्ध कॉंगेस अशी थेट लढत आहे. या मतदार संघात शिक्षणमंत्री आशिष शेलार विरुद्ध आसिफ झकेरिया असा सामना होणार आहे. 

मालाड | रमेश ठाकूर, शिवसेना  VS अस्लम शेख , कॉंग्रेस 

मालाडमध्ये विद्यमान कॉंग्रेस आमदार अस्लम शेख आपली जागा वाचवू शकतील का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अस्लम शेख यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार रमेश ठाकूर यांचं आव्हान आहे.. 

 

अणुशक्तीनगर नगर मतदार संघ | तुकाराम काते, शिवसेना  VS नवाब मलिक, राष्ट्रवादी

 
राष्ट्रवादीचे मुख्य नेते, मुंबईच्या प्रश्नांसोबत राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते नवाब मलिक यांच्यासमोर शिवसेनेच्या तुकाराम काते याचं आव्हान आहे. तुकाराम काते हे अणुशक्ती नगरचे विद्यमान आमदार आहेत. तुकाराम काते हे आपली राग राखणार का हे पाहावं लागेल.

वर्सोवा मतदार संघ | डॉ भारती लव्हेकर भाजप Vs राजूल पटेल, शिवसेना बंडखोर

वर्सोव्यात भाजपच्या विद्यमान आमदार डॉक्टर भारती लव्हेकर विरुद्ध शिवसेनेच्या बंडखोर राजूल पटेल या निवडणूक लढवत आहेत. राजूल पटेल यांचा या मतदार संघात चांगला जनसंपर्क आहे. या मतदार संघात मनसेने देखील संदेश देसाई यांना उमेदवारी दिली आहे. 

चेंबूर मतदार संघ | प्रकाश फातर्फेक, शिवसेना Vs चंद्रकांत हंडोरे, कॉंग्रेस

दलित आणि बहुजन भाग असणारा मतदार संघ म्हणजे चेंबूर मतदार संघ. या मतदार संघात शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी थेट लढत आहे. प्रकाश फातर्फेकर हे चेंबूरमधील शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासमोर चंद्रकांत हंडोरे हे कॉंग्रेसचे उमेदवार उभे आहेत.  

अंधेरी पूर्व मतदार संघ | रमेश लटके , शिवसेना Vs मुरजी पटेल, भाजप बंडखोर Vs जगदीश कुट्टी, कॉंग्रेस 

या मतदार संघात रमेश लटके हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. जागावाटपात अंधेरीची जागा हि सेनेकडे देण्यात आली. दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी या मतदारसंघातून बंड पुकारलंय. इथे कॉंग्रेसने विद्यमान नगरसेवक जगदीश कुट्टी यांना तिकीट दिलंय.            

चांदिवली मतदार संघ | नसीम खान कॉंग्रेस Vs दिलीप लांडे , शिवसेना 

चांदिवलीची जागा देखील काँग्रेसकडेच आहे.. नसीम खान यांच्यासमोर शिवसेनेचे दिलीप लांडे यांचं आव्हान आहे..

दरम्यान या सर्व उमेदवारांच भवितव्य 21 ताखेला EVM माधींमध्ये बंद होईल.  

पूर्व विधानसभा निवडणुकीत सहभागी व्हा! नोंदवा तुमचं मत..!

Web Title: marathi news vidhansabha 2019 interesting fights of mumbai
 


संबंधित बातम्या

Saam TV Live