विधानसभेत आघाडीला मनसेची साथ ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मे 2019

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीत सामावून घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीत सामावून घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. राज ठाकरे यांनी राज्यभरात भाजपविरोधात प्रचार केला. राज यांच्या सभांना जोरदार प्रतिसादही लाभला. मात्र, आघाडीला त्याचा फायदा उचलता आला नाही. राज्यात विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. महाआघाडीत मनसेचा समावेश केल्याशिवाय पर्याय नाही, असे आघाडीतील काही नेत्यांचे मत आहे. लोकसभेसाठी मात्र काँग्रेसकडून मनसेबाबत सकारात्मक प्रतिसाद नव्हता. 

आता निकालानंतर काँग्रेसचे हळूहळू मतपरिवर्तन होत आहे. मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणुकांना सामोरे गेल्यानंतर यश मिळू शकते, असे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यासाठी आतापासूनच राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्‌टी यांनीदेखील राज यांची भेट घेतली आहे. राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतही चर्चा केली आहे. माणिकराव ठाकरे यांनी अधिकृतपणे राज यांची केवळ सदिच्छा भेट घेतल्याचे स्पष्ट केले असले; तरी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे समजते.

Web Title: Vidhansabha Election 2019 Aghadi NCP Congress MNS manikrao thakre Politics


संबंधित बातम्या

Saam TV Live