मारहाण प्रकरणात अभिनेता विद्युत जमवालची निर्दोष मुक्तता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

मुंबई - क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून एकाच्या डोक्‍यात काचेची बाटली मारल्याच्या आरोपातून अभिनेता विद्युत जमवाल याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ऑगस्ट २००७ मधील हे प्रकरण आहे. जमवाल हा मित्रासह हॉटेलमध्ये गेला होता. त्या वेळी तेथे राहुल सुरी याला जमवालचा धक्का लागल्याने त्याने राहुलच्या डोक्‍यावर काचेची बाटली मारली, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. मात्र, या घटनेचा कोणताही साक्षीदार न्यायालयासमोर न आल्याने गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.

Web Title: vidyut jamwal release in hitting case

संबंधित बातम्या

Saam TV Live