मुंबईकरांचा पावसाळा रामभरोसे; मुंबई तुंबली तर मनपा जबाबदार नाही

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई
बुधवार, 16 मे 2018

मुंबईकरांनो यंदाच्या पावसाळ्यात तुमचा परिसर तुंबला तर तुमची काळजी तुम्हीच घ्या, कारण मुंबई महापालिका तुमच्या मदतीला धावून येईल याची शाश्वती नाही. कारण महापौरांनी मुंबई तुंबली तर त्याला महापालिका जबाबदार नाही असं स्पष्टपणं सांगून टाकलंय. एमएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळं पर्जन्यवाहिन्या तुटल्यात त्यामुळं मुंबई तुंबली तर आम्ही जबाबदार नाही असं त्यांनी सांगूनही टाकलंय.

पावसाळा पंधरा दिवसांवर आला असताना मुंबईतली नालेसफाई कासवगतीनं सुरू आहे. आतापर्यंत सरासरी पन्नास टक्के म्हणजे निम्मीच नालेसफाई झालीय. त्यामुळं मेट्रोची काम सुरू असलेला भाग वगळून इतर भागात पाणी तुंबणार नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे मुंबईत यंदाच पाणी तुंबेल असंही नाही बरं का? गेल्या अनेक वर्षांपासून दर पावसाळ्यात एक दोन वेळा तरी मुंबई तुंबतेच. प्रत्येक वेळा खापर फोडण्यासाठी वेगवेगळं कारणं फोडलं जात. कधी 9 किलोमीटर लांबीच्या ढगावर... तर कधी मुंबईकरांवर... यंदा हे खापर फोडण्यासाठी एमएमआरडीचा माथा शोधण्यात आलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live