महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीत युतीत न लढता स्वबळावर लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा युतीबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले आहे. तसेच आमच्याकडे कोणतेही अदृश्य हात आले नसल्याचेही सांगितले.

संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ होती व राहणार. दिल्लीचे तख्त देखील हा मोठा भाऊ गदागदा हलवणार. मात्र भाजप कडून युतीचा प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत. शिवसेना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर मर्यादा आठ लाख रुपये करावी अशी मागणी करणार आहे. आठ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करावे. देशात अनेक अदृश्य हात काम करत असतात. त्यामुळे आमच्याकडे असा युतीबाबत कोणताही हात आलेली नाही.

Web Title: We are the biggest brother in Maharashtra say's Sanjay Raut


संबंधित बातम्या

Saam TV Live