कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते वाट बघत आहेत निवडणुकीच्या निकालाची!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांचे कुंपणावरील नेते सध्या बुचकळ्यात पडले आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून ठरणार आहे. 

मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांचे कुंपणावरील नेते सध्या बुचकळ्यात पडले आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून ठरणार आहे. 

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या राजकीय भूमिकेमुळे राधाकृष्ण विखे यांना राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीच विखे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र विखे अद्याप कॉंग्रेस पक्षात आहेत. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. विखे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेऊन आपली राजकीय दिशा निश्‍चित करतील, असे मानले जाते. केंद्रात भाजपची पुन्हा सत्ता स्थापन झाली तर विखे भाजपमध्ये प्रवेश करतील, अन्यथा ते कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत करतील, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. 

विखे यांच्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे मुंबईत कॉंग्रेसच्या विरोधात प्रचार केला. तरीही कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. तसेच कोळंबकर यांनीदेखील पक्ष सोडला नाही. स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार नीतेश राणे हे कॉंग्रेस पक्षात आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडली तरीही नीतेश राणे पक्षातच आहेत. कॉंग्रेसचे आणखी एक आमदार जयकुमार गोरे हेदेखील कॉंग्रेस पक्ष सोडणार, अशी चर्चा आहे. 

कॉंग्रेस पक्षातील या कुंपणावरील नेत्यांप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हेदेखील अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच "राष्ट्रवादी'चे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला. या दोन नेत्यांवर राष्ट्रवादीने कारवाई केली नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे हे सर्व नेते सध्या कुंपणावर असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ते पुढील निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते. 

Web Title: Congress-NCP leaders waiting for loksabha election 2019 result


संबंधित बातम्या

Saam TV Live