एप्रिल महिन्यात रिलीज होणार मोदींच्या आयुष्यावरील वेबसिरीज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता मोदींच्या आयुष्यावर वेबसीरिज येत आहे. मोदींच्या आयुष्यावरील हि वेबसीरिज १० भागांत असून एप्रिल मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे. 

देशातील एका सामान्य माणसापासून ते देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास ह्या वेबसीरिज मध्ये पाहायला मिळणार आहे. Directed by Umesh Shukla [who directed #OhMyGod and #102NotOut  ओ माय गॉड आणि १०२ नॉट आऊट चे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरिजचे दिग्दर्शन करताना दिसणार आहेत. तसेच इरॉस नॉऊवर ही सीरिज पाहता येणार आहे. मोदींच्या आयुष्यातील चढ-उतार, त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'मोदी'असं या वेबसीरीजचं नाव असून त्याचं पोस्टरदेखील लॉंच करण्यात आले आहे. या सीरिज मध्ये महेश ठाकूर हे मोदींचा रोल करताना दिसणार आहेत. 

Web Title: Websites on Modi's life to be released in April
 
संबंधित बातम्या

Saam TV Live