Whatsapp | 'हे' आहे #Whatsapp चं नवीन फिचर..

Whatsapp | 'हे' आहे #Whatsapp चं नवीन फिचर..

WhatsApp आपण सर्वच वापरतो. WhatsApp चेक केलं नाही, असा आपला एक तासही जात नाही. अशातच WhatsApp ने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. WhatsApp आता लवकरच तुम्हाला मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट देणार आहे. WABetainfo या  ब्लॉगच्या  रिपोर्टनुसार  व्हाट्सअप कंपनी या संबंधी टेस्टिंग करत असल्याचं सांगितलं आहे. याच ब्लॉगच्या रिपोर्टनुसार आता WhatsApp Beta व्हर्जन 2.19.120.20 मध्ये #WhatsApp मल्टी डिव्हाइस सपोर्ट असणार आहे.  

या नवीन मल्टी डिव्हाइस सपोर्ट मधून आता वेगवेगळ्या मोबाइलवरून तुम्ही तुमचं WhatsApp अकाउंट लॉग इन करू शकणार आहात. सध्या फक्त एकाच फोनमध्ये तुम्ही WhatsApp वापरू शकतात. WhatsApp Web च्या माध्यमातून तुम्ही मोबाइल सोबतच तुमच्या कॉम्प्युटरवर देखील WhatsApp वापरू शकतायत. मात्र आता फेसबुक किंवा ट्विटरसारखं तुम्ही वेगवेगळ्या मोबाइलमधून आता तुम्ही WhatsApp वापरू शकतात. 

WABetainfo या ब्लॉग च्या माहितीनुसार या बीटा व्हर्जनमध्ये एक रजिस्ट्रेशन किंवा व्हेरिफिकेशन कोड चा ऑपशन असू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या फोनमधून लॉगइन कराल तेंव्हा तुम्हाला हा कोड वापरून व्हेरिफिकेशन करायला लागू शकतं.    

WhatsApp सध्या फक्त एकाच मोबाइलवर वापरता येतंय. याचं मुख्य कारण त्याच्याशी संबंधित सुरक्षा आहे. आणि म्हणूनच एकापेक्षा जास्त मोबाइलवर लॉगइन फिचर सुरु करण्याआधी WhatsApp ला याबाबत डिटेल टेस्टिंग करावं लागणार आहे.  

WhatsApp च्या मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट सोबतच ग्राहक WhatsApp च्या डार्क मोड ची देखील वाट पाहतायत. मात्र, याबद्दल अजून काहीही माहिती समोर येताना दिसत नाहीये. मात्र याबाबतचे स्क्रीनशॉट लिक झाल्याने आता या फीचर्सची उत्सुकता वाढलीये.    

WebTitle : WhatsApp to role out its new feature of multiple device support soon

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com