#Vidhansabha2019 : या निवडणुकीतही वंचित बिघडविणार विधानसभेचं गणित ?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मुंबई : मुंबईत प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. शिवसेना भाजप युती आणि कॉंग्रेस आघाडी यांच्यात चुरस आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांची दाणादाण उडविली. मुंबईतील 11 मतदार संघात वंचितचा प्रभाव राहण्याची शक्‍यता आहे. तर काही मतदार संघात कमी अधिक प्रमाणात वंचित परिणाम करू शकते. या निवडणुकीतही वंचित मुंबईतील निवडणुकीचे गणित बिघडविण्याची शक्‍यता आहे. 

वंचित बहूजन आघाडीचा फटका गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला बसला. कॉंगेस आघाडीचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. लोकसभेला युतीचे मुंबईतील सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. दलित मतदारांची संख्या काही मतदार संघात मोठी असल्याने तेथे कॉंग्रेसचे उमेदवार निवडून येत आहेत. चेंबूरमधून कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, धारावीमधून कॉंग्रेच्या वर्षा गायकवाड, कुर्ला मतदार संघातून कॉंग्रेसचे मिलिंद कांबळे, खेरवाडीमधून जनार्दन चांदूरकर हे त्या मतदार संघातून निवडून आले.

चांदूरकर हे चारवेळा या मतदार संघातून निवडून आले होते. तर गायकवाड यांची ही चौथी वेळ आहे. कुर्ला, चेंबूर, खेरवाडी, धारावी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्‍चिम, विक्रोळी, भांडूप, कांदिवली, मालाड, वरळी, या मतदार संघात दलितांचा प्रभाव असून तेथे वंचितचा उमेदवार आहेत. मुंबईतील सर्वच मतदार संघात दलित मतदारांची संख्या कमी अधिक प्रमाणात आहे. ही मते आता वंचितसह सर्वच राजकीय पक्षात विभागली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र कॉंग्रेस आघाडीसाठी वंचित अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या लोकसभा निवडणूकीत वंचितचा फायदा युतीला झाल्याचा ठपका कॉग्रेस आघाडीच्या नेत्यांनी ठेवला. मात्र ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप खोडून काढला होता. आता वंचित विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. वंचितने आपली जागा निर्माण केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुंकीचे गणित वंचिमुळे बिघडण्याची शक्‍यता आहे. 11 मतदार संघात वंचितची ताकद असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Will Vanchit bahujan aghadi have an effect in the Assembly elections?
 
संबंधित बातम्या

Saam TV Live