आरोप करायला तुम्ही सात वर्षे उशीर केला: रितेश देशमुख 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 मे 2019

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या टीका केल्यानंतर विलासरावांचा मुलगा व अभिनेता रितेश देशमुखने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत तुम्ही आरोप करायला सात वर्षे उशीर केला असे म्हटले आहे. 

पियुष गोयल यांनी सोमवारी विलासराव देशमुख यांच्यावर टीका करताना म्हटले होते, की मी मुंबईकर आहे. तुम्हाला जर मुंबईवरील दहशतवादी हल्ला आठवत असेल तर त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तीन दिवस दहशतवादी गोळीबार करत असताना सरकारने काहीच केले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे घटनास्थळी एका चित्रपट निर्मात्याला घेऊन गेले होते. या निर्मात्याच्या चित्रपटात मुलाला भूमिका मिळावी म्हणून विलासराव धडपडत होते.

गोयल यांच्या या टीकेला उत्तर देताना रितेशने ट्विट करत म्हटले आहे, की मी ताज/ ऑबेरॉयला हॉटेलमध्ये वडिलांसोबत गेलो होतो हे खरे आहे. पण चित्रपटात काम मिळावे म्हणून ते प्रयत्न करत होते हे खोटे आहे. माझे वडील मला चित्रपटात काम मिळावे यासाठी कधीही कुठल्याच निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मात्र जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. सर, तुम्ही थोडा उशीर केलात सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते.

Web Title: You are seven years late says Riteish Deshmukh hits back at Piyush Goyal

संबंधित बातम्या

Saam TV Live