युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत परतले; जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा केला पूर्ण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबई : जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत परतले आहेत. या यात्रेबाबत आज (मंगळवार) ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत.

गेल्या आठवडयातील प्रतिसाद, आगामी काळातील तयारी यावर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि वडिल उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतील असे समजते. आदित्य यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा शिवसेनेचे जहाल नेते संजय राउत यांच्या कार्यक्षेत्रात होता. ते ज्या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत. त्याच जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात प्रवास झाल्याने यात्रेला आक्रमक रूप प्राप्त झाले.

आदित्य हे भावी मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेला अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे आक्रमकरित्या मांडले गेल्याने भाजपत काहीशी अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशा विधानांमुळे युतीत अविश्‍वासाचे वातावरण निर्माण होईल असे जाहीर विधान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता अन्य भाजपनेत्यांनी एकटे जाण्याची भाषा सुरू केली आहेच. शिवसेना भाजप संबंध तुटेस्तोवर ताणायचे काय अशी शंका व्यक्‍त होत असताना पुढची दिशा काय यावर आदित्य आणि उद्धव हेच परस्परांशी चर्चा करतील, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. युती पुन्हा एकदा नाजूक वळणावर पोहोचल्याचेही त्यांनी मान्य केले.

Web Title: Yuvasena chief Aditya Thackeray jan ashirwad Yatra first stage over
 
संबंधित बातम्या

Saam TV Live