मुंबईकरांची लाडकी लोकल सुरू होणार? वाचा सविस्तर...

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020
  • मुंबईकरांची लाडकी लोकल सुरू होणार?
  • उपनगरं ठरवणार, लोकल कधी सुरू होणार?
  • कोरोनाग्रस्तांचा आकडा घटवा, लोकल पळवा

सुमारे 4 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.. पण मुंबईची लोकल सुरू होईल की नाही? हे उपनगरातील नागरिकांच्या हातात आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी तसे संकेत दिलेयत.

मुंबईकरांसाठी अन्न, पाणी, निवाऱ्याइतकीच गरजेची असलेली लोकल, लॉकडाऊनमुळे बंद आहे. सुमारे 4 महिन्यांपासून मुंबईकरांची लाडकी लोकल जागच्या जागी ठप्प आहे. पण आता, हीच लोकल सुरू होण्याची चिन्हं आहेत. पण लोकलची दोरी आता मुंबई उपनगरांच्या हाती आहे. तसं आवाहन मुंबई मनपा आयुक्तांनी केलंय.

म्हणजेच, मुंबई उपनगरातील कोरोनाग्रस्त दुप्पट होण्याचा कालावधी  64 दिवसांवर  आणायला हवा, तसं झालं तर, लोकल सुरू करण्याबाबत शिफारस करता येईल. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवसांवर आला तर लोकल सुरू होऊ शकते.

याचाच अर्थ हा की, ठप्प असलेली मुंबईची लोकल सुरू होणं आता मुंबई उपनगरातील नागरिकांच्या हाती आहे. प्रत्येक संकटाशी खंबीरपणे लढणारे मुंबईकर हे नक्की करून दाखवतील. फक्त त्यासाठी गरज आहे दृढनिश्चयाची आणि कोरोनाबाबतचे नियम कोटेकोर पाळण्याची.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live