रोगापेक्षा इलाज भयंकर... आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच पाहा

रोगापेक्षा इलाज भयंकर... आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच पाहा

इंधनाचे दर रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करतायेत. सामान्यांच्या ताटातून कांदा कधीच गायब झालाय. भाज्या, डाळी, दूध सारं काही महागलंय. हे कमी होतं म्हणून की काय ? यात आता भर पडलीय ती औषधांची. औषधांच्या कमाल किमतीमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झालीय. 

बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग आदींवरील 21 अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय एनपीपीएनं घेतलाय. औषध कंपन्यांकडून रूग्णांची लूट होऊ नये यासाठी एनपीपीएनं मार्फत औषधांच्या कमाल किंमतींवर नियंत्रण ठेवलं जातं. मात्र मूळ घटकद्रव्ये आणि उप्तादन खर्च वाढल्यानं औषधांच्या किंमतीत वाढ होणारंय. 

निती आयोगानं नोव्हेंबर महिन्यात काही औषधांच्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले होते. जानेवारीपासून सुरु असलेल्या बैठकीच्या दरम्यान आधी 12 औषधांचा वाढलेल्या किंमतीच्या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आणखी 9 औषधांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. 

आधीच अव्वाच्या सव्वा फी आकारून  डॉक्टरमंडळी गोरगरीब रूग्णांची पिळवणूक करतायेत. कट प्रॅक्टिसच्या आडून 
होणारी लूट वेगळीच. त्यात आता भर पडलीय औषधांच्या वाढलेल्या किंमतींची. यात सर्वाधिक भरडला जाईल तो सर्वसामान्य व्यक्ती.

Web Title : Medicine Price Will Increase

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com