लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता...

साम टीव्ही
शनिवार, 30 मे 2020


मुंबईत लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईची लाईफलाईन लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईत लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईची लाईफलाईन लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.  वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला दिलेत.

 पावसाळ्यात कोव्हिडच्या फैलावाची भीती सर्वाधिक आहे. महापालिकांची आणि शासनाची रुग्णालये ही कोव्हिड 19 साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारांसंदर्भात खासगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्राकडे लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्याची माहिती आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांसी संवाद साधणार आहेत. उद्या म्हणजेच ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महत्त्वाच्या विषयांवर मन की बातच्या माध्यमातून देशातील नागरिकांना संबोधित करत संवाद साधत असतात. पण यावेळी सर्वांचं लक्ष  लॉकडाउनसंबंधीच्या निर्णयाकडे असणार आहे. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत अल्याने नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या 24 तासात राज्यातील 114 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. त्याचबरोबर एका पोलिसाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचंही समजतंय. या नव्या रुग्णांमुळे राज्यातील एकूण 2 हजार 325 पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. तर आतापर्यंत एकूण 26 पोलिसांचा मृत्यू झालाय.  त्यामुळे दिवसेंदिवस चिंता वाढतच चालली आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live