मुरबाडच्या आजीबाईंच्या शाळेची दखल लिम्का बुकमध्ये 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

मुरबाडमधल्या फांगणे गावातल्या आजीबाईंच्या शाळेची दखल लिम्का बुकनेही घेतलीय. या शाळेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय. इथल्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेचे शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या कल्पनेतून ही शाळा साकारण्यात आली असून दर रविवारी ही शाळा भरते. या शाळेत गावातील ६० ते ९० वयाच्या सर्व आज्जींचा सहभाग असतो.. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे देखील या शाळेने अधोरेखित केलंय. या अनोख्या शाळेमुळे मुरबाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. त्याचबरोबर जगभरातून या शाळेचं कौतुक होतंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live