हॉटेलमध्ये जेवत असताना झालेल्या भांडणात गेला जीव 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

किरकोळ वादातून कत्तीने वार करुन तरुणाचा खुन केल्याची घटना बुधवारी (ता. 5) मध्यरात्री शहरातील कोल्हेर रोड भागात घडली. सचिन गायकवाड (वय 24, गेवराई) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी विनोद जोगदंड यास अटक केली आहे.

किरकोळ वादातून कत्तीने वार करुन तरुणाचा खुन केल्याची घटना बुधवारी (ता. 5) मध्यरात्री शहरातील कोल्हेर रोड भागात घडली. सचिन गायकवाड (वय 24, गेवराई) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी विनोद जोगदंड यास अटक केली आहे.

शहरातील आकाश श्रीराम जाधव व विनोद जोगदंड हे दोघे मित्र बुधावारी रात्री हॉटेलमध्ये जेवत असतांना त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी विनोदने आकाशच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन त्याला जखमी केले. जखमी आकाशला त्याच्या इतर मित्रांनी घरी सोडले. घडला प्रकार आकाश जाधव याने मेहुणा सचिन गायकवाडला सांगीतले. यानंतर हे दोघेही मारहाणीची विचारणा करण्यासाठी विनोद जोगदंड याच्याकडे गेले. यावेळी विनोद जोगदंडने आकाश जाधव याला कत्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आकाश कत्तीचा मार चुकवीत त्या ठिकाणाहून पळून गेला.

परंतु, त्याचा मेहुणा सचिन गायकवाड व विनोद जोगदंड यांच्यात मारामारी सुरू झाली. यामध्ये विनोदने सचिनवर कत्तीनेवार केले. यामध्ये तो रक्तबंबाळ होवून बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेनंतर विनोद जोगदंड फरार झाला. या प्रकरणी गेवराई पेालिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी आरोपी विनोद जोगदंडला सहा तासांत अटक केली. तपास पोलिस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live