VIDEO | धर्माच्या भींती तोडणारी माणुसकी! जेव्हा मुस्लिम व्यक्ती हिंदू मुलींचं कन्यादान करतो...

साम टीव्ही
रविवार, 23 ऑगस्ट 2020

दोन लेकींना छातीशी कवटाळून धाय मोकलून रडतायत ते आहेत बाबा पठाण. आणि मुलींची नावं आहेत गौरी आणि सावरी भुसारी. संपूर्ण जगाला मानवतेचं दर्शन घडवणारी ही घटना घडलीय अहमदनगरच्या बोधेगावात. खरंतर बोधेगाव हे सविता भुसारी यांचं माहेर. 

लग्नानंतर नांदायला जाताना मुलगी बापाला कवटाळून रडते. असं चित्र आपण नेहमीच बघतो. पण ही गोष्ट थोडी वेगळीय. वेगळी असली तरी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारी आहे. जाती-धर्माच्या भिंती तोडणारी माणुसकी कशी असते.

दोन लेकींना छातीशी कवटाळून धाय मोकलून रडतायत ते आहेत बाबा पठाण... आणि मुलींची नावं आहेत गौरी आणि सावरी भुसारी. संपूर्ण जगाला मानवतेचं दर्शन घडवणारी ही घटना घडलीय अहमदनगरच्या बोधेगावात. खरंतर बोधेगाव हे सविता भुसारी यांचं माहेर. त्या 20 वर्षांपासून माहेरात राहतातच. हातातोंडाशी आलेल्या दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार. मोठ्या कष्टातून त्यांनी मुली-मुलाला लहानाचं मोठं केलं. मुलींचं लग्न ठरलं. पण वडील आणि भाऊ दोघेही हे जग सोडून गेलेत. अशा सगळ्या परिस्थितीत गौरी आणि सावरीचं कन्यादान कोण करणार? प्रश्न मोठा होता. पण मानलेला भाऊ असलेले बाबा पठाण हिमालयासारखे उभे राहिले. मामा बनून.

एका मुस्लिम व्यक्तीने हिंदू मुलींचं कन्यादान केलं म्हणून बाबा पठाण यांचं कोतुक होतंय. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बाबा पठाण यांनी जपलेली मानवता. ती कोणत्याही कौतुकापेक्षा प्रचंड मोठी आहे. मानलेल्या बहिणीच्या मुलींचं कन्यादान केल्याने बाबा पठाण यांचं मोठं कौतुक होतंय. पण त्या कौतुकाने हुरळून न जाता त्यांच्या ओठांवर जे शब्द येतात, ते जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे आहेत.

बाबा पठाण संपूर्ण लग्नसोहळ्यात मानलेली बहीण आणि भाच्यांच्या लग्नात धीरोधात्तपणे उभे होते. लग्नानंतर गौरी आणि सावरी नांदायला जाताना बाबा पठाण यांच्या गळ्यात पडून हमसून धुमसून रडत होत्या. मुली मग त्या कुणाच्याही असो, वडीलकीच्या नात्याचे बंध एक मनात घट्ट विणले की जीव लागण्यासाठी जाती धर्माचं बंधन हवंच कशाला? मनामनातून बांधलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला धर्माच्या गाठी हव्यातच कशाला? हेच बाबा पठाण यांनी दाखवून दिलंय. कुणीही जन्माला येताना आधी माणूस म्हणून जन्माला येतो, जाती-धर्माची लेबलं ही नंतर लागतात. हेच बाबा पठाण यांच्या जगण्याचा सार आहे. म्हणून ते मोठ्या अभिमानाने म्हणतात.


संबंधित बातम्या

Saam TV Live