मुस्लिम कार्यकर्त्यांनी सावरले 74 संसार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पुणे - घरांना आग लागून उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सुमारे 44 लाख उभारून 74 पक्की घरे बांधून दिली. या अनोख्या "बंधुभाऊ-भाईचाऱ्या'तून हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे अनोखे उदाहरण मार्केटयार्डमधील आंबेडकरनगर वसाहतीमध्ये पाहायला मिळाले. आंबेडकरनगर झोपडपट्टीमध्ये 21 एप्रिल 2018 रोजी भीषण आग लागली होती. या आगीत एकूण 74 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या झोपड्यांमधील 21 झोपड्या मुस्लिम तर तब्बल 53 झोपड्या हिंदू कुटुंबियांच्या होत्या.

पुणे - घरांना आग लागून उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सुमारे 44 लाख उभारून 74 पक्की घरे बांधून दिली. या अनोख्या "बंधुभाऊ-भाईचाऱ्या'तून हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे अनोखे उदाहरण मार्केटयार्डमधील आंबेडकरनगर वसाहतीमध्ये पाहायला मिळाले. आंबेडकरनगर झोपडपट्टीमध्ये 21 एप्रिल 2018 रोजी भीषण आग लागली होती. या आगीत एकूण 74 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या झोपड्यांमधील 21 झोपड्या मुस्लिम तर तब्बल 53 झोपड्या हिंदू कुटुंबियांच्या होत्या. शासनाकडून मदत मिळण्याची आशा धूसर वाटू लागल्याने येथील 'बंधुभाऊ भाईचारा' या संस्थेच्या माध्यमातून बेघर झालेल्या लोकांना पक्की घरे बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी काही मुस्लिम कार्यकर्ते पुढे आले. स्वतःच्या खिशातून काही रक्कम गोळा करून इतर मदतीसाठी शहरातील 25 ते 30 मशिदींमधील मौलवींची मदत घेण्यात आली. मशिदींचे प्रमुख असलेले मौलाना यांच्यामार्फत समाजातील लोकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यातून अनेक मुस्लिम बांधवांनी सढळ हाताने मदत करत मोठा निधी उभा केला. याच निधीतून 74 कुटुंबियांना पक्की घरे बांधून देण्यात आली.या कामासाठी मुस्लिम समाजातील बंधुभाव-भाईचारा संस्थेचे अध्यक्ष शाबीर शेख, सलील मेमन, हाजी उस्मान शेख, जकारिया मेमन, नदीम शेख, जब्बार शेख, सादीक शेख, गफार शेख या सर्वांनी विशेष कष्ट घेतले.

 ''संकटात असणाऱ्यांना मदत उभी करणे हेच आम्हाला आमचा धर्म शिकवतो. ही मदत उभी करताना कोणताही धर्म किंवा जात पाहिली जात नाही. मानवतावादी दृष्टीकोनातून जी व्यक्ती अडचणीत आहे. त्यांना मदत करणे आमचे काम आहे. यातून प्रेम-भावना निर्माण होते आणि दोन्ही धर्मांमधील सलोखा वाढण्यास मदत होतो. - शाबीर शेख, अध्यक्ष, बंधुभाऊ भाईचार संस्था, पुणे

'आगीत घर जळून गेल होतं. शासनाची काही मदत झाली नाही पण मुस्लिम समाजातील लोकांनी मदत केली. दोन-तीन महिने बेघरच होतो. आता पक्कं घर तयार झालं. आमचं काही नसतानाही या लोकांनी आम्हाला घरे बांधून दिली'.

'माझं घर मशिदीला जोडूनच आहे. माझ्या घराची परिस्थिती खूपच खराब झाली होती. त्यांनी मला कसलाही मोबदला न घेता संपूर्ण घर बांधून दिले. मी धार्मिक माणूस आहे. देवाला मानतो. मग हिंदू असो किंवा मुस्लिम. - शरद क्षीरसागर, लाभार्थी

web: marathi news muslims helps 74 families who burnt in fire 


संबंधित बातम्या

Saam TV Live