त्रिपुरामध्ये डाव्यांना धोबीपछाड देत भाजपला बहुमत; नागालँडमध्येही भाजपची आघाडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

त्रिपुरात अडीच दशकापासून सीपीएमची सत्ता असून 20 वर्षांपासून माणिक सरकार मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. मात्र यंदा त्यांच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावत, आपला हक्क दाखवला आहे. सत्ताधारी सीपीएमला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं असून, भाजपने 41 जागांवर बहुमत मिळवत एकतर्फी लढत जिंकली. तर नागालँडमध्ये  एनडीपीपीसोबत हातमिळवणी करत भाजपचा सत्तेत परतण्याचा प्रयत्न आहे. मेघालयमध्ये दहा वर्षांपासून काँग्रेसचं सरकार सत्तेवर आहे. तेथेही भाजपने त्यांना जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान ईशान्येत भाजपला सत्ता मिळाल्यामुळे, संध्याकाळी भाजप संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली.

त्रिपुरात अडीच दशकापासून सीपीएमची सत्ता असून 20 वर्षांपासून माणिक सरकार मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. मात्र यंदा त्यांच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावत, आपला हक्क दाखवला आहे. सत्ताधारी सीपीएमला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं असून, भाजपने 41 जागांवर बहुमत मिळवत एकतर्फी लढत जिंकली. तर नागालँडमध्ये  एनडीपीपीसोबत हातमिळवणी करत भाजपचा सत्तेत परतण्याचा प्रयत्न आहे. मेघालयमध्ये दहा वर्षांपासून काँग्रेसचं सरकार सत्तेवर आहे. तेथेही भाजपने त्यांना जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान ईशान्येत भाजपला सत्ता मिळाल्यामुळे, संध्याकाळी भाजप संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह उपस्थित असतील. या बैठकीत तिन्ही राज्यांकरता पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live