नागपुरात सिंगापूर लॉटरीचा धुमाकूळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नागपुरात सायबर गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय. सिंगापूर लॉटरीच्या नावाखाली लोकांची लूट सुरूंय. इथल्या उदयनगर भागातील कमल भगत यांना अशाच प्रकारे एका कस्टमर केअर कडून सिंगापुरी लॉटरी लागल्याचा फोन आला. 35 लाख मिळवायचे असतील तर सुरक्षा रक्कम भरावी लागेल असं सांगून या भामट्यांनी त्यांना तब्बल साडेचार लाखांचा गंडा घातला. 

तर दुसऱ्या एका घटनेत लंकेश्वर उमाटे या 64 वर्षांच्या व्यक्तीला एटीएमची मुदत संपल्याचं सांगून चोरट्यांनी ओटीपी नंबर मिळवत त्यांच्या अकाऊंटमधून 89 हजार रूपये काढून घेतले. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं पोलिसही चक्रावून गेलेत. 

या सायबर गुन्हेगारांना पकडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. कारण त्यांचे बँक अकाऊंट नंबर हे देखील बनावट आहेत. त्यामुळे तुम्हाला असा कुणाचा फोन झाला तर आपल्या अकाऊंटची माहिती देऊ नका. अन्यथा या चोरट्यांचं पुढील सावज तुम्ही असाल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live