लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांचे नाव निश्चित : शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 मार्च 2019

लोकसभा 2019
नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांचे नाव निश्चित झाले असले, तरी आज सायंकाळी सात वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजते.

पवार यांनी आज सकाळी पक्षाच्या झालेल्या बैठकीत जगताप यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दादा कळमकर, सुजीत झावरे यांनी जगताप यांचा सत्कार केल्याचे छायाचित्रे व्हायरल झाली. त्यामुळे जगताप यांची उमेदवारी निश्चित असली, तरी अधिकृतपणे आज सायंकाळी ही उमेदवारीची अधिकृत घोषणा शरद पवार करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, आज दुपारी नगर जिल्ह्यातील नेत्यांशी पवार व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे संवाद साधणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीबाबत ते मार्गदर्शन करणार असून, सायंकाळी त्याची घोषणा होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Jagtaps candidature announcement will be at evening seven for Loksabha Elections

संबंधित बातम्या

Saam TV Live