प्रताप ढाकणेंची आता विधानसभेसाठी तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मे 2019

नगर : पाथर्डी-शेवगाव विधानसभेच्या तयारीसाठी अनेक चेहरे सरसावले आहेत. भाजपअंतर्गत कार्यकर्त्यांची दुफळी तयार होत झाल्याचा फायदा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राज्य सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे घेण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेला उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना ती हुकली. आता विधानसभेची तरी हुकणार नाही, याची काळजी ते घेताना दिसत आहेत.

नगर : पाथर्डी-शेवगाव विधानसभेच्या तयारीसाठी अनेक चेहरे सरसावले आहेत. भाजपअंतर्गत कार्यकर्त्यांची दुफळी तयार होत झाल्याचा फायदा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राज्य सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे घेण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेला उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना ती हुकली. आता विधानसभेची तरी हुकणार नाही, याची काळजी ते घेताना दिसत आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रारंभी खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी देण्याचे सुतोवाच केले होते. जर गांधी भाजपचे उमेदवार असते, तर राष्ट्रवादीकडून अॅड. ढाकणे यांनाच उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. तथापि, राजकीय घडामोडींमध्ये गांधी यांच्या एेवजी डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. लगेचच राष्ट्रवादीनेही त्यांना तोडीस-तोड उमेदवार देण्याचा घाट घालत आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. भाजपचा उमेदवार बदलला नसता, तर ढाकणे यांना संधी मिळत होती. त्यासाठी अॅड. ढाकणे यांनी तयार केलेला गृहपाठ तयास ठेवावा लागला. त्याचा फटका त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारीपासून मुकावे लागले.

विधानसभेची धूळपेरणी 
लोकसभा नाही, तर विधानसभेला तरी उमेदवारी मिळेल, या आशेने अॅड. ढाकणे तयारी करतील, अशी शक्यता आहे. उमेदवारी मिळाली नाही, तरी त्याचा राग मनात त्यांनी धरला नाही. उलट मोठ्या जोमाने जगताप यांचे काम केले. यातच त्यांनी विधानसभेची बिजे पेरल्याचे मानले जाते. या मतदारसंघात भाजपचे दोन गट आहेत. आमदार मोनिका राजळे यांना मानणाऱ्या गटाच्या व्यतिरिक्त असलेले कार्यकर्ते ढाकणे यांनाही मानतात. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांची मुठ अॅड. ढाकणे बांधतील, अशीच शक्यता आहे. नव्हे, भाजप अंतर्गत दुहीचा फायदा ढाकणे घेतली, असे बोलले जाते.  

लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जनशक्ती मंचच्या नेत्या तथा जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी अचानक राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. एव्हढेच नव्हे, तर जगताप यांच्या प्रचारात सक्रीय झाल्या. त्यांना विधानसभेच्या उमेदवारीची आशा असल्याने शरद पवार व काकडे यांच्यात काय गुप्तगू झाले, याबाबतची चर्चा बाहेर आलीच नाही. विधानसभेला उमेदवारीचा शब्द दिला असल्यास मात्र ढाकणे यांची अडचण होऊ शकते. मात्र त्या अजून राष्ट्रवादीतही नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते त्यांची उमेदवारी स्विकारण्याची शक्यता नाही, असे समजते.

Web Title : Pratap Dhakane is now preparing for the Legislative Assembly


संबंधित बातम्या

Saam TV Live