रोहित पवार विधानसभेची तयारी करत असल्याने कर्जतमध्ये राम शिंदेंची डोकेदुखी वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

नगर ः कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार हे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर या मतदारसंघात आघाडीकडून तगडा उमेदवार मिळणार असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची डोकेदुखी झाली नसेल, तर नवलच!

लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी रोहित पवार यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. वाड्यावस्त्यांवर जावून कार्यकर्त्यांचे मोहळ तयार केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. 

रोहित यांना उमेदवारी केल्यास त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जोरदार ताकद लावतील. युतीकडून प्रा. राम शिंदे उमेदवार असल्याने व त्यांचे भाजपांतर्गत वजन वाढल्याने त्यांच्या विजयासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताकद लावतील. त्यामुळे ही लढत काट्याची होईल, यात शंका नाही. प्रा. शिंदे यांनी विखेंच्या प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक सभा गाजविल्या असल्या, तरी विखेंची मदत त्यांच्या विजय किंवा पराजयावरच अवलंबून राहणार आहे.

काॅंग्रेस नेत्यांची समजूत कशी घालणार?

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान आगामी नियोजनाचे स्वप्न पाहिले. त्यानुसार या मतदारसंघात काॅंग्रेसच्या मिनाक्षी साळुंके यांनीही उमेदवारीची तयारी सुरू केल्याचे समजते. परंतु रोहित पवार यांनी उमेदवारी केल्यास साळुंके यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. परका उमेदवार नको म्हणून लोकसभेदरम्यान दक्षिणेतील नेत्यांनी प्रचाराचा मुद्दा केला. डाॅ. सुजय विखे पाटील यांना परका उमेदवार म्हणून नेते एकत्र आले. आता रोहित पवारही या मतदारसंघात परकाच असणार आहे. तो कसा चालेल, अशीच काहीशी भावना साळुंके यांच्या गटातून व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार यांना आघाडीअंतर्गत काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची समजूत घालावी लागणार आहे.

Web Title : Ram Shinde's increased headache since Rohit Pawar will be in the Legislative Assembly from Karjatam

संबंधित बातम्या

Saam TV Live