#Loksabha2019 : कॉंग्रेसमधील नाराजांना वंचित बहुजन आघाडीकडून ऑफर ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

नागपूर - माजी खासदार नाना पटोले यांचे नाव नागपूर लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्याने कॉंग्रेसमधील नाराजांना वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने लढण्याची ऑफर दिली जात आहे. कॉंग्रेसमध्ये इच्छुक असलेल्यांना फोन करून लढण्याबाबत विचारणाही केली जात आहे. 

नागपूर - माजी खासदार नाना पटोले यांचे नाव नागपूर लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्याने कॉंग्रेसमधील नाराजांना वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने लढण्याची ऑफर दिली जात आहे. कॉंग्रेसमध्ये इच्छुक असलेल्यांना फोन करून लढण्याबाबत विचारणाही केली जात आहे. 

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. ओवेसी यांच्या एमआयएमसोबत त्यांनी युती केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना आघाडीत सहभागी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, समाधानकारक जागा दिल्याशिवाय आघाडीत सहभागी होणार नसल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आता महाआघाडीची शक्‍यता राहिलेली नाही. त्यामुळे वंचित आघाडीने राज्यातील 48 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी सक्षम उमेदवारांचा शोध वंचित आघाडीतर्फे घेतला जात आहे. 

नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात कोण लढणार अशी चर्चा कालपर्यंत रंगली होती. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रा. बबनराव तायवाडे यांची नावे आघाडीवर होती. अनेकांनी दिल्लीत फिल्डिंग लावली होती. मात्र, पक्षाने गडकरी यांच्या विरोधात लढवण्यासाठी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांच्या नावाला पसंती दिली. बुधवारी त्यांचे नावही जाहीर केले. बाहेरचा उमेदवार लादल्याने स्थानिक नेते नाराज झाले आहेत. त्यांच्यामधून कोणी गळाला लागतो काय यासाठी वंचित आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेकांनी आघाडीच्या वतीने फोन आल्याचे सांगितले. मात्र, तूर्तास त्यांना कोणीही होकार कळविला नाही. 

मनसेही उमेदवाराच्या शोधात 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेही लोकसभा निवडणूक लढेल एवढा सक्षम उमेदवार नाही. त्यांचाही भर आयात उमेदवारावरच आहे. मनसेने अनेक कॉंग्रेसच्या इच्छुकांना फोन करून आमच्या पक्षाकडून लढा अशी विनंती केल्याचे समजते.

Web Title: Loksabha 2019 bahujan vikas aaghadi give offer to congress leader


संबंधित बातम्या

Saam TV Live