नागपुरमध्ये 12 शिक्षकांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

लिपिक आणि शिपायाचा मानसिक छळ करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या. बेझनबाग येथील गुरुनानक प्राथमिक शाळेतील 12 शिक्षकांविरुद्ध जरीपटका पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.

एकाचवेळी एक डझन शिक्षकांविरुद्ध अशाप्रकारचा गुन्हा दाखल होण्याची नागपुरातील ही पहिलीच घटना होय. न्यायालयाच्या आदेशानंतर जरीपटका पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

सप्टेंबर 2017 मध्ये या शिक्षकांनी शाळेचे लिपिक आणि शिपाई यांना शिक्षकांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. याची तक्रार प्रशासनाकडे केल्यानंतर चौकशी समितीनेही शिक्षकांना दोषी ठरविले होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई न झाल्याने अखेर दोघांनी न्यायालयात धाव घेतली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live