जिवंत पत्नीला मृत दाखवून केले दुसरे लग्न

जिवंत पत्नीला मृत दाखवून केले दुसरे लग्न

नागपूर - जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत पावल्याची खोटी माहिती दुसऱ्या घटस्फोटित महिलेला देत तिच्याशी लग्न केले. दुसऱ्या पत्नीला तिची फसवणूक झाल्याचे कळताच तिने धंतोली पोलिस ठाण्यात पतीने मानसिक व शारीरिक फसवणूक केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अरुण आनंदराव मौंदेकर (५४, रा. जागनाथ बुधवारी) असे या ठगबाजाचे नाव असून तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे. 

अरुण मौंदेकर हा जिल्हा कचेरीत अर्जनवीस म्हणून काम करतो. त्याला पत्नी, दोन मुले आणि मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपली प्रोफाईल जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड केली होती. दत्तात्रयनगर, नवीन सुभेदार येथे राहणाऱ्या वैशाली मौंदेकर (४३) या घटस्फोटित महिलेनेदेखील याच संकेतस्थळावर आपली प्रोफाईल अपलोड केली होती.

वैशालीला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. अरुणची प्रोफाईल पाहून वैशालीने त्याच्याशी संपर्क साधला. सप्टेंबर २०१८ मध्ये दोघेही जनता चौकातील गणेशसागर रेस्टॉरंट येथे भेटले. त्यावेळी अरुणने ‘माझी पत्नी मृत झाली असून मला एक मुलगा व आई आहे’ असे सांगून लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्याने पत्नीच्या मृत्यूचा दाखला आणि शपथपत्रदेखील दाखविले. त्यामुळे वैशालीचा त्याच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर त्यांनी एका मंदिरात लग्न केले. लग्नाला तो एकटाच आला होता. वैशालीच्या कुटुंबीयांनी इतर नातेवाईक का आले नाहीत, अशी विचारणा केली असता आईला हृदयविकाराचा त्रास असल्याने ती आली नाही, अशी थाप मारली. 

लग्नानंतर अरुणने वैशालीला तिच्या आईवडिलांकडेच राहण्यास सांगितले. ‘घरी सर्वकाही ठिकठाक झाल्यास घरी नेतो’ असे तिला सांगितले होते. त्यामुळे वैशालीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. लग्नानंतर त्यांच्या गाठीभेटी होत असत. दोघेही बाहेर फिरायला जात होते. दिवसामागून दिवस जात असल्याने वैशालीने त्याला घरी नेण्यास म्हटले. तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे वैशालीने त्याची चौकशी केली असता अरुणला पत्नी आणि मुले असल्याची माहिती समजली. वैशालीची फसवणूक झाल्याचे तिच्या आईला समजताच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही वैशालीने अरुणला समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला धमक्‍या द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तिने धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. चौकशीअंती अरुणने वैशालीची फसवणूक केल्याचे निष्पन्न होताच धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अरुण मौंदेकर यास अटक केली.

अनेक महिलांना फसविल्याचा संशय
अरुण मौंदेकर याने शादी डॉट कॉमवर आपल्या दोन प्रोफाईल अपलोड केल्या होत्या, अशी माहिती आहे. त्यावरून त्याने अनेक महिलांची फसवणूक केली असावी, असा संशय धंतोली पोलिसांना असून त्या दिशेने पोलिस निरीक्षक प्रसाद सनस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Cheating Marriage Crime

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com