शरद पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले...

शरद पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले...

नागपूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेकजण बाहेर पडत आहेत. कुणी त्या पक्षात राहायला तयार नाही. यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टोलाही लगावला. राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजपमध्ये येणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. 

सध्या भाजपमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा पूर आला आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले. राष्ट्रवादीतील चित्रा वाघ, मधुकर पिचड, सचिन पिचड, अशी मोठी यादी भाजपमध्ये जाणाऱ्यांची आहे. शरद पवार यांनी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सिम्बॉयसिस विद्यापीठ कॅम्पसच्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना टोलेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजपला कुणाच्याही मागे धावण्याची गरज नाही.

साखर कारखाने तसेच सहकार क्षेत्रातील अडचणीबाबत सरकारने या नेत्यांना मदत केली. त्यामुळे आज ते भाजपमध्ये येत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपात येण्यास इच्छुक आहेत, पण त्यातून काही निवडक लोकच घेणार आहोत, ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे अशा कोणालाही भाजप आपल्या पक्षात घेणार नाही. आम्हाला आशा लोकांची गरज नाही. दबाव टाकून पक्षात या हे म्हणण्याची आता भाजपवर वेळ राहिली नाही. भाजपकडे जनाधार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे लोकच आता भाजपात येतात, जे चांगले आहेत, लोकाभिमुख कामे करतात त्यातल्या निवडक लोकांना पक्षात घेतले जाईल. इतरांनी दुसऱ्या पक्षात जायचं ते जातील, भाजपने कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: cm debvendra Fadanvis attack back on Sharad Pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com