वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा नागपूर खंडपीठाने का दिला इशारा?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020

दुचाकी वाहन उत्पादकांनी दुचाकीची विक्री करतानाच वाहनाबरोबर हेल्मेट पुरविले नाही तर अशा वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय.

पुणे - दुचाकी वाहन उत्पादकांनी दुचाकीची विक्री करतानाच वाहनाबरोबर हेल्मेट पुरविले नाही तर अशा वाहनांच्या नोंदणीवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. दुचाकी उत्पादकांनी विकलेल्या प्रत्येक वाहनाबरोबर आयएसआय चिन्ह असलेली दोन हेल्मेट पुरविली पाहिजेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.  

केंद्रीय मोटार वाहन नियमावलीनुसार दुचाकी उत्पादकाने प्रत्येक वाहनांबरोबर भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेली दोन हेल्मेट पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे पालन होत नसल्याबद्दल न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीत न्यायालयाने नोंदणीवर मर्यादा आणण्याचा इशारा दिला आहे. वाहन उत्पादक कंपन्या वाहने विक्रीसाठी पाठवताना त्यांबरोबर हेल्मेट पाठवत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना हेल्मेट देणे शक्‍य होत नाही, असे वाहन वितरकांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले होते. 

मात्र, न्यायालयाने राज्याच्या परिवहन आयुक्तांनाही या बाबतीत कळविले असून, प्रत्येक वाहनांबरोबर हेल्मेट ग्राहकाला न पुरविल्यास संपूर्ण राज्यातील दुचाकी वाहन नोंदणी बंद केली जाईल, अशी ताकीद दिली आहे.

Web Title Nagpur Court Warns To Ban Vehicle Registration In Maharashtra But Why


संबंधित बातम्या

Saam TV Live