नागपुरात पावसाचा कहर; नागपूरचं झालं 'पाणीपूर'

तुषार रूपनवरसह संजय डाफ
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबईची तुम्ही तुंबई झालेली पाहिली असेल पण नागपूरचं आज पाणीपूर झालं. चार ते पाच तासांच्या पावसानं नागपूर शहरातं तुंबापूर झालं. नागपूर शहरात ठिकठिकाणी पावसाचं पाणी तुंबलं होतं. एवढंच नाही तर विधानभवन परिसरातही पावसाचं पाणी साचून तळं साचलं होतं.

पावसाचा कहर असताना वीज पुरवठ्यानंही मान टाकली. विधानभवन परिसरातली वीज गेल्यानं विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज दिवसभर तहकूब करण्याची वेळ सरकारवर ओढवलीय.

भाजपची सत्ता असलेल्या नागपुराचं तुंबापूर झालं म्हटल्यावर, शिवसेनेनंही भाजपला शालजोडीतले लगावण्याची संधी सोडली नाही.

आता नागपुरात झालेल्या पावसाची आकडेवारी सांगून याचं सगळं खापर निसर्गावर फोडण्याचा प्रयत्न होईल. वेगानं वाढणाऱ्या शहरांची सांडपाण्याची व्यवस्था किती तकलादू आहे हे नागपूरच्या पावसानं दाखवून दिलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live